Recent Posts

Information

अँड्रॉइड फोन रूट कसा करावा?

अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे नेमके काय? ते जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
अँड्रॉइड फोन रूट करण्यासाठी इंटरनेटवर खूप वेब साईट्स आहेत ज्या तुम्हाला तुमचा फोन रूट करण्यासाठी उपयोजने पुरवत असतात. त्यांपैकी काही उपयोजनांची माहिती आपण आज जाणून घेऊ.
अँड्रॉइड फोन रूट करणे हे वेगवेगळ्या मोबाईल हँडसेटवर आणि अँड्रॉइडच्या आवृत्तीवर अवलंबून असते. त्यामुळे रूट करण्याआधी तुमचा अँड्रॉइड फोनची आवृत्ती तसेच तुमचा मोबाईल हँडसेट कोणता आहे हे जाणून रूट करावा. रूटींग उपयोजन तुमच्या मोबाईल मध्ये छोटासा फेरबदल करते आणि सुपर युजर (Super  User ) नामक उपयोजन इन्स्टॉल करते. ज्यामुळे तुम्हाला व्यवस्थापनाचे (Administrator Level) सर्व अधिकार मिळतात ज्याने तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुम्हाला हवे तसे बदल करू शकता. रूट करण्याच्या आधी तुम्हाला "USB Debugging" हे पर्याय चालू करावे लागेल ते तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये सापडेल.


१. "झेड-४-रूट" (z४root) :

जर तुमचा मोबाईल हँडसेट खालीलपैकी असेल तर तुम्ही हे उपयोजन (Application ) वापरू शकता.
(Samsung Galaxy S (All variants), Backflip, Sony X10, Xperia Mini, Droid 2, Galaxy Tab, Galaxy I5700, Galaxy 3 I5800, Droid X, Samsung Acclaim, Cricket Huawei Ascend, Motorola Cliq, Huawei 8120, HTC Hero, HTC G1, Optimus T, Motorola Droid 1, Garmin Asus A50, Motorola Defy, LG Ally, Motorola Flipside, Motorola Milestone 2, Dell streak, X10 Mini Pro, Smartq v7 android 2.1, Dell XCD35/ZTE Blade).

हे उपयोजन १००% खात्रीलायक व सुरक्षित आहे त्यमुळे तुमचा फोन खराब होण्याची शक्यता नाही. तसेच ह्या उपयोजनामध्ये टेंपररी रूट (Temporary Root ), परमनंट रूट (Permanant Root ), रि-रूट (Re-root ) व अन-रूट (Un-root ) असे काही महत्वाचे पर्याय देखील उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त टेंपररी रूट किंवा परमनंट रूट वर क्लिक करायचे आहे. रूट वर क्लिक केल्यानंतर तुमचा फोन ५ मिनिटांत रि-स्टार्ट होतो आणि तुमचा फोन रूट होतो. टेंपररी रूट केला तर तुमचा फोन तात्पुरता रूट होईल आणि जेव्हा तुम्ही तुमचा फोन रि-स्टार्ट कराल तेव्हा तुमचा फोन पूर्वस्थितीत होईल. परमनंट रूट मध्ये तुमचा फोन कायमचा रूट होईल. तुमचा फोन जर रूट झाला असेल पण रूट व्यवस्थित काम करत नसेल तर तुम्ही रि-रूट वर क्लिक करून पुन्हा रूट करू शकता. जर तुम्हाला तुमचा फोन पूर्वस्थितीत करायचा असेल तर तुम्हाला अन-रूटवर क्लिक करावे लागेल. हे उपयोजन मी स्वतः माझ्या पूर्वीच्या डेल एक्स. सी. डी. ३५ (Dell XCD३५) ह्या मोबाईल हँडसेट वर वापरलेले होते. हे उपयोजन डाऊनलोंड करण्यासाठी इथे क्लिक करा.

"झेड-४-रूट" (z४root) चे स्क्रीनशॉट

२. जिंजरब्रेक (Gingerbreak ):

जर तुमचा फोन वरील उपयोजनाने रूट होत नसेल तर आणि तरच हे उपयोजन वापरावे. कारण हे उपयोजन वापरण्यासाठी तुम्हाला तुमचे मेमरी कार्ड फॉरम्याट (Format) करावा लागेल. ह्यात तुम्हाला रूट आणि अन-रूट हे दोन पर्याय मिळतील. हे उपयोजन वापरण्याआधी दुसरा रूट करण्याचा पर्याय शोधावा. जिंजरब्रेक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
जिंजरब्रेक (Gingerbreak ) चे स्क्रीनशॉट


३. सुपरवनक्लिक (SuperOneClick):

जर तुमचा मोबाईल हँडसेट खालीलपैकी असेल तर तुम्ही हे उपयोजन (Application ) वापरू शकता.
(Acer Liquid Metal, Dell Streak, HTC Magic (Sapphire) 32B, HTC Bee, LG Ally, Motorola Atrix4G, Motorola Charm, Motorola Cliq, Motorola Droid, Motorola Flipside, Motorola Flipout, Motorola Milestone, Nexus One, Samsung Captivate, Samsung Galaxy 551 (GT-I5510), Samsung Galaxy Portal/Spica I5700, Samsung Galaxy S 4G, Samsung Galaxy S I9000, Samsung Galaxy S SCH-I500, Samsung Galaxy Tab, Samsung Transform M920, Samsung Vibrant, Sony Ericsson Xperia E51i X8, Sony Ericsson Xperia X10, Sprint Hero, Telus Fascinate, Toshiba Folio 100, LG Optimus One P500, Motorola Defy)

हे उपयोजन वापरण्यासाठी तुम्हाला विंडोज किंवा लिनक्स ओ.एस. असलेला पी. सी. लागेल. तसेच हे उपयोजन वापरण्यासाठी तुम्हाला तुमच्या विंडोज पी. सी. मध्ये मायक्रोसॉफ्टचे .नेट  फ्रेमवर्क २.०+(Microsoft .NET Framework २.०+) इन्स्टॉल करावे लागेल. तसेच तुमच्या मोबाईल सेटिंग मधील "USB Debugging" हे पर्याय चालू करावे लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या मोबाईलसाठी यु.एस.बी. ड्राईवर्स (USB Drivers ) डाऊनलोड करून तुमच्या संगणकामध्ये इन्स्टॉल करावे लागेल. हे सर्व केल्यानंतर तुम्हाला सुपरवनक्लिक हे उपयोजन चालू करून पुढील प्रक्रिया करावी लागेल. सुपरवनक्लिक वापरणे थोडेसे अवघड आहे पण ह्याने तुमचा फोन रूट होतो. ह्या उपयोजनाचा प्रयोग मी माझ्या मित्रांच्या एलजी ऑपटीमस वन पी५०० (LG Optimus P५००) व मोटोरोला डीफाय (Motorola Defy) ह्या मोबाईल हँडसेट्स वर केला असून तो यशस्वी झाला आहे. सुपरवनक्लिक डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
जर तुमचा फोन वरील कोणत्याही प्रकारात नसेल तर तुम्ही तुमच्या हँडसेटसाठी गूगल वर रूटसाठी उपयोजन शोधावे लागेल.
सुपरवनक्लिक (SuperOneClick) चे स्क्रीनशॉट

रूट करण्यासाठी घेण्याची खबरदारी:

१. रूट करणे म्हणजे नेमके काय? त्याचे फायदे तोटे काय? ते कसे करतात ह्या बद्दलची आधी पूर्ण माहिती करून घ्या.
२. रूट करताना कोणते उपयोजन वापरणार आहात त्या बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
३. रूट करण्याआधी "USB Debugging" हे पर्याय चालू करावे (ते तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये सापडेल).
४. रूट करण्याचा सगळ्या प्रक्रिया काळजीपूर्वक पाळा.
५. रूट झाल्यावर तुमच्या मोबाईलची वॉरंटी जाऊ शकते.

तर कसा वाटला हा लेख? आवडला ना? जर रूट करण्यामागे तुम्हाला काही अडचण असेल तर तुमच्या प्रक्रिया खाली पोस्ट करा. अँड्रॉइड आणि इतर तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहितीसाठी ब्लॉगला भेट द्या. धन्यवाद!

अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे काय? रूट करण्याचे फायदे आणि तोटे.

तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन तुम्हाला रूट करायचा आहे? पण माहित नाही कसा करावा ते? तर मग आजच्या लेखामध्ये आपण अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे काय? रूट करण्याचे नक्की फायदे आणि तोटे कोणते हे जाणून घेऊया.


१. अँड्रॉइड काय आहे?

-अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

२. अँड्रॉइड फोन रूट करणे म्हणजे नक्की काय?

अँड्रॉइड रूट  करणे हि एक प्रक्रिया आहे जी अँड्रॉइड ओ. एस. वापरकर्त्याला त्याच्या स्मार्टफोन, टॅबलेट पी.सी. वरील संपूर्ण ताबा मिळून देते. रुटींगमुळे मोबाईल फोन कंपनीने फोन तयार करताना फोनवर घातलेल्या बहुतेक सर्व बंधानांवर वापरकर्त्याला ताबा मिळवता येतो तसेच काही उपयोजने (Applications) इन्स्टॉल करता येतात ज्यासाठी व्यवस्थापक (Administrator) दर्जाची आवश्यकता असते.

 ३. अँड्रॉइड फोन रूट करण्याचे फायदे.

(अ) विशेष उपयोजने वापरता येतात:

तुमचा फोन रूट केल्यानंतर तुम्ही काही विशेष उपयोजने इन्स्टॉल तसेच वापरू शकता ज्यांना रूट प्रवेशाची परवानगी हवी असते साध्या भाषेत सांगायचा झालं तर तुम्ही काही विशेष उपयोजने वापरू शकता जी रूट केलेल्या फोन वरच चालू शकतात. उदाहरणार्थ, १. तुम्ही तुमच्या अँड्रॉइड फोन च्या प्रोसेसरची गती वाढवू शकता ज्याला इंग्रजीमध्ये  "Overclocking" असे म्हणतात. २. तुम्ही तुमच्या फोनमधील सुरुवातीपासून इन्स्टॉल असलेली जी तुम्हाला नको असलेली उपयोजने ज्याला इंग्रजी मध्ये "Bloatwares" असे म्हणतात ती तुम्ही डिलीट किंवा अनइन्स्टॉल करू शकता.
माझा सोनी एरिक्सनचा फोन मी रूट
 करून मी त्याचा प्रोसेसरची गती वाढवली
 आहे म्हणजेच "Overclock" केला आहे.






 (ब) तुम्ही कस्टम रोम (ROM ) वापरू शकता:

 रुटींग करण्याचा हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. कधीना कधी तरी आपला फोन जुना होतो आणि बहुतेक सर्व मोबाईल फोन निर्मात्या कंपन्या फोनला अपडेट्स देण बंद करतात, ज्यामुळे आपल्याला आपला फोन जुना वाटू लागतो. ह्यावर उपाय म्हणजे आपला फोन आपण स्वतःच आपल्याला हवा त्या नवीन आवृत्तीमध्ये तसेच आपल्याला हवा तसा फेरफार करून अपडेट करणे. ज्यात वावपार्कार्त्याला त्याचा अँड्रॉइड फोन अँड्रॉइडच्या नवीन सुधारित आवृत्तीच्या तसेच स्वतः फेरफार अथवा बदल केलेल्या रोममध्ये (ज्याला इंग्रजी मध्ये "Custom ROM" असे म्हणतात.) फोन अपडेट करता येतो. आजकाल बहुतेक सर्व अँड्रॉइड फोनसाठी कस्टम रोम इंटरनेटवर सहज सापडतात. 

 (क) जास्त इंटरनल स्टोरेज:

अँड्रॉइडमध्ये काही उपयोजने फक्त फोन मेमरीमध्ये इन्स्टॉल होतात त्यामुळे आपल्या फोनची इंटरनल स्टोरेज मेमरी लवकर कमी होते. पण रुटींग केलेल्या फोनमध्ये फोन मेमरी मधील उपयोजने मेमरी कार्डमध्ये आपण सहज विस्थापित तथा हलवू शकतो. काही उपयोजने तरीही विस्थापित होत नसतील तर त्यासाठी दुसऱ्या उपयोजनाची आवश्यकता असते जो रूट केलेल्या फोनवरच चालू शकतो. तर हे झाले रूट करण्याचे फायदे. रूट करण्याचे काही तोटे आहेत जे खालीलप्रमाणे.

४. अँड्रॉइड फोन रूट करण्याचे तोटे.

 (अ) तुमचा फोन खराब होऊ शकतो:

जर तुम्ही रूट करण्याची प्रक्रिया व्यवस्थित पाळली नाही तसेच कोणतीही स्टेप येत नाही म्हणून गाळली तर तुम्हाला तुमचा फोन गमवावा सुद्धा लागू शकतो. शक्यतो अस काही होत नाही कारण आपणच आपल्या फोनबाबत सतर्क असतो. जर असे काही झाल्यास आपला फोन परत मिळवण्यासाठी आपल्याला इंटरनेट वर खूप मदत मिळू शकते तसेच जर आपला फोन वॉरंटीमध्ये असेल तर काहीच चिंता नाही. पण फोन खराब न होण्याची काळजी घेतलेली बरी.

(ब) तुमच्या फोनची वॉरंटीचा शेवट होऊ शकतो:

जेव्हा तुमचा फोन रूट होईल तेव्हा पासूनचा क्षण तुमच्या फोनच्या वॉरंटीचा शेवट ठरू शकतो त्यामुळे सावधान! जर रूट केल्यानंतर तुमच्या फोनला काही झाले तर तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे घालून तुमचा फोन रिपेअर करावा लागेल. काही फोन मध्ये अन-रूट (UN-ROOT) म्हणजेच रूट केलेला फोन पूर्वस्थितीत आणण्याची सुविधा असते त्यामुळे तुमचा फोनची वॉरंटी तुम्ही परत आणू शकता.

 तर कसा वाटला लेख? आवडला का? असेल तर प्रतिक्रिया करायला विसरू नका. अँड्रॉइड बाबतचे अजून काही येणारे लेख वाचायला विसरू नका बर. धन्यवाद!

मोटोरोला फायर एक्सटी : मोटोरोलाचा बजेट अँड्रॉइड २.३ कार्यप्रणालीवर चालणारा स्मार्टफोनची ओळख, माहिती आणि वैशिष्टे.

मोटोरोला फायर एक्सटी
मोटोरोला फायर एक्सटी (Motorola Fire XT) हा मोटोरोलाचा नवीन टचस्क्रीन स्मार्ट-फोन आहे. ह्यात ३.५ इंचांची कॅपासीटीव टचस्क्रीन आहे जी मल्टी-टच सपोर्ट करते. हा मोबाईल हॅंडसेट अँड्रॉइड २.३ (जिंजरब्रेड) ह्या कार्यप्रणालीवर चालतो. ह्यात फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस

कॅमेरा देण्यात आला आहे तर विडिओ कॉलिंगसाठी ०.३ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. ह्यात कॅनेक्टीवीटीसाठी ३ जी, वाय-फाय, ब्लूटूथ, इत्त्यादी पर्याय आहेत. अश्या ह्या मोटोरोला फायर एक्सटीची वैशिष्टे पुढील प्रमाणे :


सामान्य वैशिष्ट्ये २ जी नेटवर्क जीएसएम ८५० / ९०० / १८०० / १९००

३ जी नेटवर्क एचएसडीपीए २१००

सध्य स्तिथी उपलब्ध.
आकार ११४ x ६२ x ११.९५ एमएम
डिसप्ले डिसप्लेचा प्रकार कॅपासीटीव टचस्क्रीन

डिसप्लेचा आकार ३२० x ४८० पिक्सेल, ३.५ इंचेस
डिसप्लेच्या इतर सुविधा प्रॉक्सीमिटी सेंसर, अॅक्सेलेरोमीटर सेंसर, मल्टी-टच
आवाज कॉल अलर्ट प्रकार वायब्रेशन, एमपी-३ रिंगटोन.
लाऊड स्पीकर आहे.
३.५ एमएम जॅक आहे.
मेमरी फोनबुक अगणित

कॉल रेकॉर्ड आहे.
इंटर्नल फोन मेमरी ५१२ एमबी रोम, ५१२ एमबी रॅम
मेमरी कार्ड स्लॉट आहे, मायक्रो-एसडी, ३२ जीबी पर्यंत
कनेक्टीविटी आणि डाटा ट्रान्सफर जीपीआरएस आहे.
एज आहे.
३ जी एचएसडीपीए, ७.२ एमबीपीएस, एचएसयुपीए ३४८ केबीपीएस
वायरलेस लॅन वाय-फाय ८०२.११ बी/जी
ब्लूटूथ आहे.
इन्फ्रारेड नाही.
युएसबी आहे, मायक्रो युएसबी वर्जन २.०
कॅमेरा प्राथमिक कॅमेरा ५ मेगापिक्सेल, २५९२x१९४४ पिक्सेल पिक्सेल, ऑटोफोकस, फ्लॅश.
विडिओ कॅमेरा आहे.
द्वितीय कॅमेरा आहे, वीजीए,विडिओ कॉलिंगसाठी
सुविधा कार्यप्रणाली अँड्रॉइड २.३ (जिंजरब्रेड)
सीपीयु ८०० एमएचझेड प्रोसेसर
मेसेजिंग ईमेल, पुश ईमेल, एसएमएस, एमएमएस
न्याहाळक वॅप २.० / एक्सएचटीएमएल, एचटीएमएल
रेडिओ एफएम रेडिओ
गेम्स आहे.
जीपीएस आहे.
जावा आहे, व्हाया जावा एमआयडीपी इम्युलेटर
मल्टीमिडिया म्युजिक प्लेअर एएमआर एनबी, एमपी-३, डब्लूएमए प्लेअर.
विडिओ प्लेअर एच.२६३ प्लेअर, एच.२६४, इमपीईजी-४
बॅटरी बॅटरी प्रकार १५४० एमएएच लिथीयम आयर्न बॅटरी.
टॅाक टाईम ८ तास
स्टॅंडबाय टाईम २८ दिवस


मोटोरोला फायर एक्सटीची किंमत : रुपये १२,४९०/-

मायक्रोमॅक्स ए७० : मायक्रोमॅक्सचा बजेट अँड्रॉइड स्मार्टफोन, त्याची माहिती आणि वैशिष्टे

मायक्रोमॅक्स ए७०


मायक्रोमॅक्स ए७० (Micromax A70) हा मायक्रोमॅक्स ह्या भारतीय कंपनीने तयार केलेला अँड्रॉइड कार्यप्रणालीवर चालणारा एक टचस्क्रीन स्मार्टफोन आहे. हा एक स्वस्तात मस्त असा बजेट अँड्रॉइड स्मार्टफोन फोन आहे. ह्यात फोटोग्राफीसाठी ५ मेगापिक्सेलचा ऑटोफोकस कॅमेरा आहे. हा मोबाईल अँड्रॉइड २.२ म्हणजेच अँड्रॉइड फ्रोयो ह्या कार्यप्रणाली वर चालतो. ह्यात ३.२ इचेसची टिएफटी कॅपासीटीव टचस्क्रीन आहे. ह्या हॅंडसेटची मेमरी ३२ जीबी पर्यंत वाढवली जाऊ शकते. मायक्रोमॅक्स ए७० हा मायक्रोमॅक्सच्या आधीचा फोन मायक्रोमॅक्स ए६० चा उत्तराधिकारी (successor) आहे. अशा ह्या खिशाला परवडणाऱ्या मायक्रोमॅक्स ए७० ची वैशिष्टे पुढील प्रमाणे :

सामान्य वैशिष्ट्ये २ जी नेटवर्क जीएसएम ८५० / ९०० / १८०० / १९००
३ जी नेटवर्क एचएसडीपीए २१००
सध्य स्तिथी उपलब्ध.
आकार १११ x ५८ x १३.५ एमएम
डिसप्ले डिसप्लेचा प्रकार टिएफटी कॅपासीटीव टचस्क्रीन, २५६ के कलर्स
डिसप्लेचा आकार ३२० x ४८० पिक्सेल, ३.२ इंचेस
डिसप्लेच्या इतर सुविधा प्रॉक्सीमिटी सेंसर, अॅक्सेलेरोमीटर सेंसर
आवाज कॉल अलर्ट प्रकार वायब्रेशन, एमपी-३ रिंगटोन.
लाऊड स्पीकर आहे.
३.५ एमएम जॅक आहे.
मेमरी फोनबुक १०००
कॉल रेकॉर्ड आहे.
इंटर्नल फोन मेमरी १६० एमबी
मेमरी कार्ड स्लॉट आहे, मायक्रो-एसडी, ३२ जीबी पर्यंत
कनेक्टीविटी आणि डाटा ट्रान्सफर जीपीआरएस आहे.
एज आहे.
३ जी एचएसडीपीए, ७.२ एमबीपीएस
वायरलेस लॅन वाय-फाय ८०२.११ बी/जी, वाय-फाय हॉट-स्पॉट
ब्लूटूथ आहे, वर्जन २.१  सोबत ए२डीपी
इन्फ्रारेड नाही.
युएसबी आहे, मायक्रो युएसबी वर्जन २.०
कॅमेरा प्राथमिक कॅमेरा ५ मेगापिक्सेल, २५९२x१९४४ पिक्सेल पिक्सेल, ऑटोफोकस
विडिओ कॅमेरा आहे.
द्वितीय कॅमेरा आहे, वीजीए
सुविधा कार्यप्रणाली अँड्रॉइड २.२ (फ्रोयो)
सीपीयु ६०० एमएचझेड प्रोसेसर
मेसेजिंग ईमेल, पुश ईमेल, एसएमएस, एमएमएस
न्याहाळक वॅप २.० / एक्सएचटीएमएल, एचटीएमएल
रेडिओ एफएम रेडिओ
गेम्स आहे.
जीपीएस आहे.
जावा आहे, व्हाया जावा एमआयडीपी इम्युलेटर
मल्टीमिडिया म्युजिक प्लेअर एमपी-३, एएसी,  डब्लूएवी प्लेअर.
विडिओ प्लेअर एमपी-४, एच.२६३ प्लेअर.
बॅटरी बॅटरी प्रकार १४५० एमएएच लिथीयम आयर्न बॅटरी.
टॅाक टाईम ४ तास
स्टॅंडबाय टाईम ७ दिवस

मायक्रोमॅक्स ए७० ची किंमत : रुपये ६,७००/-

एचपी ओम्नी सिरीस २००-५३३०आयएन (HP Omni Series 200 -5330IN) ऑल इन वन डेस्कटॅाप संगणकाची माहिती आणि वैशिष्टे.



एचपी ओम्नी सिरीस २००-५३३०आयएन (HP Omni Series 200 -5330IN) ऑल इन वन डेस्कटॅाप संगणकाची माहिती आणि वैशिष्टे पुढील प्रमाणे :


एचपी ओम्नी सिरीस २००-५३३०आयएन (HP Omni Series 200 -5330IN)

  • कार्यप्रणाली (OS) : विंडोज ७ होम बेसिक
  • प्रोसेसर : इंटेल कोअर-आय३ ५५० प्रोसेसर (३.२ गिगाहर्ट्झ)
  • ग्राफिक्स : इंटेल एचडी ग्राफिक्स
  • रॅम : २ जीबी डीडीआर रॅम
  • हार्ड डिस्क : ५०० जीबी हार्ड डिस्क
  • डिसप्ले : २१.५ इंचेस एलइडी डिसप्ले (१९२०x१०८० पिक्सेल)
  • सुपर मल्टी साटा ड्राईव, डबल लेअर सपोर्टिंग लाईग्टस्क्राईब टेकनॉलॉजी
  • ६ इन १ मेमरी कार्ड रिडर
  • स्टेरिओ स्पीकर, स्टेरिओ साऊंड
  • युएसबी कीबोर्ड
  • एचडीएमआय पोर्ट, आयइइइ १३९४, २x स्टेरिओ हेडफोन, युएसबी २.० x ९, स्टेरिओ मायक्रोफोन
  • वजन : ८.२५ केजी

एचपी ओम्नी सिरीस २००-५३३०आयएन (HP Omni Series 200 -5330IN) ऑल इन वन डेस्कटॅापची किंमत : रुपये ३५,४४४/-

नोकिया सी२-०२ : नोकियाचा कमी किंमतीचा टचस्क्रीन सोबत स्लाईडर मोबाईल फोनची ओळख, त्याची माहिती आणि वैशिष्टे.

नोकिया सी२-०२



नोकिया सी२-०२ (C2 -02) हा नोकियाचा नवीन कमी किंमतीचा म्हणजेच सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा टचस्क्रीन स्लाईडर मोबाईल फोन हॅंडसेट आहे. हा लूक मध्ये तर खुपचं छान आहे. हा मोबाईल फोन नोकियाच्या एस-४० (Series 40) ह्या कार्यप्रणालीवर चालतो. ह्यात सर्वसामान्य माणसाची गरज भागाव्णाऱ्या बहुतेक सगळ्या सुविधा आहेत. फोटोग्राफी ह्यात २ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला गेला आहे. ह्या मोबाईल फोनची मेमरी तुम्ही ३२ जीबी पर्यंत वाढू शकता. तर चला मग ह्या मोबाईल फोनची बाकीची वैशिष्टे पुढील प्रमाणे :




सामान्य वैशिष्ट्ये२ जी नेटवर्कजीएसएम ९०० / १८००
जीएसएम ८५० / १९००

सध्य स्तिथीउपलब्ध.

आकार१०३ x ५१.४ x १७ एमएम.
डिसप्लेडिसप्लेचा प्रकारटीएफटी रेजिस्टीव टचस्क्रीन, ६५ के कलर्स.

डिसप्लेचा आकार२४० x ३२० पिक्सेल , २.६ इंचेस.

डिसप्लेच्या इतर सुविधाहॅंडराईटिंग रेकगनाइज़
आवाजकॉल अलर्ट प्रकारवायब्रेशन, एमपी-३ रिंगटोन.

लाऊड स्पीकरआहे.

३.५ एमएम जॅकआहे.
मेमरीफोनबुक१००० कॉनटॅकट्स

कॉल रेकॉर्डआहे

इंटर्नल फोन मेमरी१० एमबी

मेमरी कार्ड स्लॉटआहे, ३२ जीबी पर्यंत, २ जीबी मोबाईल फोन सोबत
कनेक्टीविटी आणि डाटा ट्रान्सफरजीपीआरएसआहे, क्लास १२, ३२-४८केबिपीएस

एजआहे, क्लास १२

३ जीनाही.

वायरलेस लॅननाही.

ब्लूटूथआहे, वर्जन २.१  सोबत ए२डीपी

इन्फ्रारेडनाही.

युएसबीआहे, मायक्रो युएसबी वर्जन २.०
कॅमेराप्राथमिक कॅमेरा२ मेगापिक्सेल, १६००x१२०० पिक्सेल

विडिओ कॅमेराआहे, क्यूसीआयएफ @ १५एफपीएस
सुविधामेसेजिंगईमेल, पुश ईमेल.

न्याहाळकवॅप २.०/एक्सएचटीएमएल, एचटीएमएल, आरएसएस फीड्स.

रेडिओएफएम रेडिओ

गेम्सआहे.

जीपीएसनाही.

जावाआहे, एमआयडीपी २.१
मल्टीमिडियाम्युजिक प्लेअरएमपी-३, एएसी,  डब्लूएवी प्लेअर.

विडिओ प्लेअरएमपी-४, एच.२६३, एच.२६४ प्लेअर.
बॅटरीबॅटरी प्रकारलिथीयम आयर्न १०२० एमएएच बॅटरी.
किंमत
रुपये ४,२००

नोकिया सी२-०२ ची किंमत : रुपये ४,२००/-

अँड्रॉइड

अँड्रॉइडचा लोगो
अँड्रॉइड हा माझा ब्लॉगरवरील पहिलाच लेख असल्यामुळे लिहिताना कुठून सुरुवात करावी हेच मला कळत नव्हते अखेर सुरुवात केली. बहुतेकांनी अँड्रॉइड बद्दल ऐकलेच असेल किंवा अँड्रॉइडची जादू स्वतः अनुभवली देखील असेल. काय म्हणता, "ऐकलं आहे अँड्रॉइड बद्दल पण माहित नाही काय आहे ते?". तर जास्त विचार करू नका मी आहे ना... मी सांगतो तुम्हाला हे अँड्रॉइड आहे तरी काय? आणि काय चीज आहे हे अँड्रॉइड? चला तर मग आज आपण ह्या अँड्रॉइडबद्दल अजून थोडे जाणून घेऊया.

अँड्रॉइड हि एक ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच एक कार्यप्रणाली आहे जी गूगलने खास मोबाईल फोनसाठी तयार केली आहे. हि लिनक्स या मुक्तस्त्रोत कार्यप्रणाली वर चालणारी एक मुक्तस्त्रोत कार्यप्रणाली आहे. मुक्तस्त्रोत असल्यामुळे जगातील कोणतीही व्यक्ती जीला प्रोग्रामिंग बद्दल थोडेसे ज्ञान आहे ती व्यक्ती अँड्रॉइडचा विकास सहजपणे करू शकते.  ३१ ऑक्टोबर २००८ रोजी गूगलने अँड्रॉइडची प्रथम आवृत्ती संपूर्ण जगासमोर आणली आणि बघता बघता तिने जगातील बहुतेक सर्व मोबाईल फोन प्रेमींवर खासकरून तरुणांवर आपली छाप टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अँड्रॉइड प्रथम मोबाईल फोनवर प्रदर्शित करण्यात आली पण सध्या अँड्रॉइड टॅबलेट पी.सी.साठी देखील लोकप्रिय होत आहे. मोबाईल फोन आणि टॅबलेट पी.सी.साठी सध्याची नवीन आवृत्ती अँड्रॉइड ४.२ आहे जी "जेली बीन" या नावाने ओळखली जाते. मुक्तस्त्रोत असल्यामुळे अँड्रॉइडचा विकास झपाट्याने होत आहे. अँड्रॉइडमध्ये जावा प्रोग्रामिंगसाठी विकासकांना स्वातंत्र्य मिळालेले आहे.

अँड्रॉइड आज इतकी लोकप्रिय झाली आहे कि, जगभरातील बहुतेक प्रसिद्ध मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांनी आपापल्या नवनवीन मोबाईल फोनमध्ये अँड्रॉइडचा वापर करण्यास सरुवात केली आहे. मोबाईल फोनमध्ये अँड्रॉइड असणारी जगभरातील बहुतेक सगळीच मोबाईल फोन प्रचंड प्रसिद्ध होत आहेत. त्यात एच.टी.सी., सॅमसंग, सोनी एरिक्सन, मोटोरोला, एलजी, डेल, इत्त्यादी प्रसिद्ध मोबाईल फोन उत्पादक कंपन्या अग्रेसर आहेत इतकेच काय तर  भारतातील मायक्रोमॅक्स, स्पाइस, इत्यादी मोबाईल फोन कंपन्यासुद्धा मागे नाहीत. अँड्रॉइड असणारा एक मोबाईल बाजारात आला नाही कि दुसरा मोबाईल लगेच येऊन मनाला भुरळ लाऊन जातो. त्यामुळे हा फोन घेऊ कि तो फोन घेऊ असे विचार लगेचच मनात येत राहतात. अँड्रॉइड कार्यप्रणाली असणारे मोबाईल फोन ऍपलच्या आयफोन खालोखाल प्रचंड गतीने लोकप्रिय होत आहेत. इतकेच काय तर २०१० च्या वर्षासरती अँड्रॉइड जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन प्लॅटफॉर्म बनला आणि त्याने जगावर सलग १० वर्षे मोबाईल रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नोकियाच्या सिंबियन कार्यप्रणालीला मोठा धक्का दिला हा धक्का इतका मोठा होता कि त्यातून सिंबियन अजूनही सावरू शकला नाही. २०१० च्या वर्षासरती कॅनालायीसने केलेल्या रिसर्चनुसार जगभरातून अँड्रॉइड कार्यप्रणाली असणारे ३३% मोबाईल फोन विकले गेले तर नोकियाच्या सिंबियनचे ३१% मोबाईल फोन विकले गेले.

अँड्रॉइड मुक्तस्त्रोत असल्यामुळे कोणतीही व्यक्ती आपल्याला हवे तसे बदल अँड्रॉइडमध्ये करू शकते तसेच अँड्रॉइडचे सॉफ्टवेयर म्हणजेच उपयोजने तयार करू शकते. अँड्रॉइडच्या या गुणधर्मामुळे आतापर्यंत गूगलच्या अँड्रॉइड मार्केटमध्ये २,५०,००० हून अधिक सॉफ्टवेयर आणि गेम्स अँड्रॉइडवर चालणाऱ्या मोबाईल फोनसाठी उपलब्ध आहेत. त्यातील बहुसंख्य सॉफ्टवेयर मोफत आहेत. अँड्रॉइडसाठी दर ६-६ महिन्यांनी नवनवीन विकसित आवृत्त्या येत असल्यामुळे आपण खरेदी केलेला अँड्रॉइड फोन लगेचच जुना म्हणजेच आऊटडेटेड वाटू लागतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या काही अँड्रॉइड विकासकांच्या वेबसाईटवर आपल्या जुन्या अँड्रॉइड फोनसाठी नवनवीन आवृत्तींच्या अपडेट्स उपलब्ध आहेत पण त्या काहीश्या अवैध म्हणजेच इललीगल वाटू लागतात.


अँड्रॉइड फोन आपल्याला हव्या त्या कंपनीचे आणि हव्या तशा किंमतीत बाजारात उपलब्ध असल्याचे दिसून येतात. साधारण रुपये ५,००० ते ४०,००० हून अधिक रुपयांत  अँड्रॉइड फोन उपलब्ध असल्यामुळे अँड्रॉइड गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय होत आहे. वायरस तसेच मालवेअर पासून सुरक्षेसाठी अँड्रॉइडसाठी वायरस विरोधी सॉफ्टवेयर उपलब्ध आहेत. बहुतेक अँड्रॉइड फोनमध्ये सर्वसाधारण सुविधा तर असतातच त्याच शिवाय ३जी, वाय-फाय, जास्त क्षमतेचा रॅम आणि जलद मायक्रोप्रोसेसर, जलद आंतरजाळ न्याहाळक म्हणजेच वेब ब्राउजर, जादा क्षमतेचा मेमरीकार्ड वापरण्याची सुविधा, जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा, मल्टी-टच स्क्रीन, मल्टी-टास्किंग, इत्त्यादी जादा सुविधा देखील असतात. हे सर्व माफक दरांत उपलब्ध असल्यामुळे अँड्रॉइड तरुणांत खूप लोकप्रिय होत आहे.

असा आहे हा 
अँड्रॉइड. ह्याचाबद्दल जितके सांगावे तितके थोडेच आहे. काय मग आवडली का अँड्रॉइडबद्दलची माहिती? मग घेतायना एक नवीन अँड्रॉइड फोन? कोणत्या कंपनीचा फोन घेतला आणि कितीला घेतला ह्याबद्दल मला सांगायला विसरू नका हां बर! मलाही आवडेल तुम्ही तुमचा आनंद माझ्यासोबत शेअर केलेला. तर लेख कसा वाटला ह्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बर मलाही आवडेल तुमच्या प्रतिक्रिया वाचून त्यांना प्रतिक्रिया करायला. धन्यवाद!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...